महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे हा आपल्या आगामी चित्रपट 'दुभंग' मध्ये उर्मिला कानेटकर सोबत दिसणार आहे. महेश कोठारे दिग्दर्शित का चित्रपट एक कौटुंबिक चित्रपट असून शंकर मिटकरी (साई शंकर फिल्मस )हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. आदित्य आणि उर्मिला या नवीन जोडीसोबतच अजिंक्य देव आणि सोनाली कुलकर्णी सुद्धा या चित्रपटात दिसणार आहेत.
अभिराम भडकमकर आणि शेखर ढवळीकर यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. संजय मेमाणे यांनी छायाचित्रण केले आहे. श्रीरंग गोदबोले यांनी या चित्रपटातील गाणी लिहिली असून बापी-तुतूल यांनी ती संगीतबद्ध केली आहेत."
Comments
Post a Comment